मुख्य बातमी

रत्नागिरीत ९ एप्रिल रोजी हिंदू नववर्ष स्वागत यात्रा

रत्नागिरी : श्री देव भैरी जुगाई नवलाई पावणाई तृणबिंदुकेश्वर संस्था आणि श्री पतितपावन मंदिर संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने गुढीपाडव्यानिमित्त ९ एप्रिलला सकाळी ९ वाजता हिंदू नववर्ष स्वागतयात्रा ग्राममंदिर ते समाजमंदिर अशी काढण्यात येणार आहे.
या यात्रेचा मार्ग श्री देव भैरी मंदिर, जयस्तंभ ते मारुती मंदिर सर्कल आणि मारुती मंदिर सर्कलवरून पुन्हा जयस्तंभ ते श्री पतितपावन मंदिर असा असणार आहे. या यात्रेत पारंपारिक वेशभूषेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सकाळी ८.३० वाजेपर्यंत श्रीदेव भैरी मंदिर आणि मारुती मंदिर सर्कल येथे उपस्थित रहावे, असे पतितपावन संस्थेचे अध्यक्ष उन्मेष शिंदे, श्रीदेव भैरी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रवींद्र (मुन्ना) सुर्वे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button