पतीत पावन मंदिरात भजन करण्यास रोखले.

रत्नागिरी :- स्वातंत्र्यपूर्व काळात जाती-जातीतील स्पृश्य अस्पृश्यता भेदभाव मिटवण्यासाठी दानशूर भक्तीभूषण श्रीमान भागोजीशेठ किर यांनी १९३१ साली स्वखर्चाने पतित पावन मंदिर बांधून श्री. लक्ष्मी नारायणाच्या मूर्ती ची स्थापना केली व ते मंदिर देवाला मानणाऱ्या सर्व धर्मियांसाठी खुले केले. कोणालाही मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन मूर्ती पूजा करण्याचे स्वातंत्र्य दिले.
त्याच मंदिरात आज बाबा परुळेकर याने भजन न करण्याचे सांगितले व तिथे भजन मंडळी यायच्या आधी षडयंत्र करून आपली मीटिंग लावली होती. तुम्हाला भजन करायचे असले तर तुमच्या इथल्या मंदिरात जाऊन भजन करा असे सांगितले.
त्यावर आधी रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे कार्यकारिणी सदस्य कौस्तुभ नागवेकर बरसले. तुमच्या मंदिरात जाऊन भजन करा बोलल्याने हे मंदिर तुमचे का अशी विचारणा केली. हे मंदिर आमच्या मानवतेच्या खर्या खुर्या मायबापाने बांधले आहे असे ठणकावून सांगितले. तुम्ही कसले मंदिर चालवता या मंदिरात टाळ नाळ सुद्धा नाही ठेवली तुम्ही. देवाची भक्ती करत नाही. तर भजन केल्यावर देवाची मोठी भक्ती होते का असे परुळेकर याने विचारले. मग बेकायदेशीर ट्रस्ट स्थापन करून मंदिराच्या नावाने निधी संकलन करून आणि श्रीमान भागोजी शेठ कीर यांच्या जमिनी बळकावून आणि मंदिरातील वस्तू चोरून त्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे ही तुमची देवाची भक्ती काय अशी विचारणा कौस्तुभ नागवेकर यांनी केली.
त्याच बरोबर आम्ही इथे भजन करणारच अशी धमकी वजा सूचना श्री राजीवजी कीर व श्री सुरेंद्र घुडे आणि श्री चंद्रहास विलणकर यांनी केली. तुमच्याकडे भजन करण्याची आम्ही परवानगी मागितलेलीच नाही व्यवस्थापनाची मागणी केली होती असे ठणकावून सांगितले. रत्नागिरी तालुका भंडारी समाज संघाचे ज्येष्ठ सभासद श्री सुरेशजी शेट्ये यांनी परुळेकर चा चांगलाच समाचार घेतला… हिंदू हिंदू करतोस आणि हिंदूलाच मंदिरामध्ये भजन करायला रोखतोस हेच तुझे हिंदुत्व काय अशी विचारणा केली. हिंदुद्वेषी परुळेकर गेट आउट असे हिंदुत्ववादी कार्यकर्ते मंदिरात म्हणाले.
आणि त्यानंतर मंदिरामध्ये भजनाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने पार पडला.



