Uncategorizedमुख्य बातमीराजकीयविधानसभा निवडणूक २०२४

जिल्ह्यात एकूण ४५ नामनिर्देशनपत्र वैध, तर १० अवैध

रत्नागिरी : आज नामनिर्देशन पत्र छाननीमध्ये जिल्ह्यातील एकूण ४५ नामनिर्देशनपत्र वैध, तर १० नामनिर्देशन पत्र अवैध ठरली, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी एम देवेंदर सिंह यांनी दिली.

विधानसभा मतदारसंघनिहाय वैध ठरलेली नामनिर्देशनपत्र अशी : २६३- दापोली विधानसभा मतदार संघ- संतोष सोनू अबगुल (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), योगेश रामदास कदम (शिवसेना), संजय वसंत कदम- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), प्रवीण सहदेव मर्चंडे (बहुजन समाज पार्टी), योगेश रामदास कदम (अपक्ष), योगेश विठ्ठल कदम (अपक्ष), संजय सीताराम कदम) अपक्ष, संजय संभाजी कदम (अपक्ष), सुनील पांडुरंग खाडे (अपक्ष), ज्ञानदेव रामचंद्र खांबे (अपक्ष).

२६४ गुहागर विधानसभा मतदारसंघ- प्रमोद सीताराम गांधी (महाराष्ट्र नवनिर्माण सेना), भास्कर भाऊराव जाधव- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), राजेश रामचंद्र बेंडल (शिवसेना), प्रमोद परशुराम आंब्रे (राष्ट्रीय समाज पक्ष), संदीप हरी फडकले (अपक्ष), मोहन रामचंद्र पवार (अपक्ष), सुनील सखाराम जाधव (अपक्ष), संतोष लक्ष्मण जैतापकर (अपक्ष), संदेश दयानंद मोहिते (अपक्ष).

२६५ चिपळूण विधानसभा मतदारसंघ- प्रशांत बबन यादव (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार), शेखर गोविंदराव निकम (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी), अनघा राजेश कांगणे (अपक्ष), नसिरा अब्दुल रहमान काझी (अपक्ष), प्रशांत भगवान यादव (अपक्ष), महेंद्र जयराम पवार (अपक्ष), शेखर गंगाराम निकम (अपक्ष), सुनील शांताराम खंडागळे (अपक्ष).

२६६ रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ- उदय रवींद्र सामंत (शिवसेना), भारत सीताराम पवार (बहुजन समाज पार्टी), सुरेंद्रनाथ यशवंत माने- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), उदय विनायक बने (अपक्ष), कैस नूरमहमद फणसोपकर (अपक्ष), कोमल किशोर तोडणकर (अपक्ष), ज्योतीप्रभा प्रभाकर पाटील (अपक्ष), दिलीप काशिनाथ यादव (अपक्ष), पंकज प्रताप तोडणकर (अपक्ष).

२६७ राजापूर विधानसभा मतदारसंघ- किरण रवींद्र सामंत (शिवसेना), संदीप विश्राम जाधव (बहुजन समाज पार्टी), राजन प्रभाकर साळवी- शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे), अमृत अनंत तांबडे (अपक्ष), अविनाश शांताराम लाड (अपक्ष), राजश्री संजय यादव (अपक्ष), राजेंद्र रविंद्रनाथ साळवी (अपक्ष), संजय आत्माराम यादव (अपक्ष), यशवंत रामचंद्र हर्याण (अपक्ष).

अवैध ठरलेली नामनिर्देशन पत्रे अशी : 

२६२ दापोली विधानसभा मतदारसंघ- अनंत पांडुरंग जाधव – राष्ट्रीय समाज पक्ष (फॉर्म सुचक १० नसल्यामुळे)

२६४ गुहागर विधानसभा मतदारसंघ- विक्रांत भास्कर जाधव- (मुख्य उमेदवाराचा अर्ज वैध ठरल्याने व फक्त एकच सूचक दिल्याने अर्ज अवैध), दीपक केशव शिगवण (शपथ घेतली नाही व विहीत ॲफिडेवीट दाखल केले नाही म्हणून अवैध), सुनील सुधीर काते (ॲफीडेवीट हे स्टॅंपपेपरवर नाही व नोटरी केलेले नाही म्हणून अवैध), सादीक मुनीरुद्दीन काझी (पुरेसे सूचक नाहीत/अनामत रक्कम जमा केली नाही/ॲफीडेवीट अपूर्ण म्हणून अवैध)

२६५ चिपळूण विधानसभा मतदारसंघ- संतोष शिंदे (समाजवादी पार्टी), स्वप्ना प्रशांत यादव (नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टी -शरदचंद्र पवार), अमित रोहिदास पवार (अपक्ष), सुनील वेतोस्कर (अपक्ष)

२६६- रत्नागिरी विधानसभा मतदारसंघ- निरंक

२६७- राजापूर विधानसभा मतदारसंघ- अविनाश शांताराम लाड- एबी फॉर्म नसल्याने अवैध

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button