मुक्त विद्यापीठाच्या मानवी हक्क शिक्षणक्रमाचा निकाल जाहीर
प्रथम क्रमांक माधुरी गमरे, द्वितीय क्रमांक समीर घडशी, तृतीय क्रमांक नामदेव जाधव

रत्नागिरी : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा माहे मे/जून २०२४ चे निकाल जाहीर झाले आहेत. या मध्ये मानवी हक्क (Human Right) कोर्सचे निकाल जाहीर झाले असून रत्नागिरी येथील विद्यापीठाचे अधिकृत अभ्यासकेंद्र रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूट चा मानवी हक्क अभ्यासक्रमाचा निकाल १०० टक्के लागला आहे
रत्नागिरी जिल्ह्यातून पत्रकारिता पदविका अभ्यासक्रमासाठी एकूण १४ विद्यार्थी बसले होते. यातील सर्व विद्यार्थी चांगल्या गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. या अभ्यासक्रमात रत्नागिरी जिल्ह्यामधून सौ. माधुरी जनार्दन गमरे (८४% गुण) या प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत तर व्दितीय क्रमांक समीर बाळू घडशी (८३.६७% गुण) आणि श्री. नामदेव आनंदा जाधव (८२% गुण) हे तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत.
मानवी हक्क अभ्यासक्रमातील सर्व विद्यार्थी फर्स्ट क्लास गुणांसह उत्तीर्ण झाले आहेत. या मध्ये राजेश गोसावी (८१.३३% गुण) व प्रमोद शिंदे (८१.३३% गुण) हे चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण तर पाचव्या क्रमांक- मंगेश बिर्जे (७८% गुण) यांचा आहे. तर गौरव मुळ्ये (७६.६७% गुण), धर्माजी पवार (७६.६७% गुण), दिपक पाटील (७५% गुण), संजय बांडागळे (७२.६७% गुण), पूनम माने (७१.३३% गुण), स्नेहल बामणे (७१% गुण), स्मिता पिलणकर (६९.३३% गुण) आणि अजित आंबवकर (६५.६७% गुण) उत्तीर्ण झाले आहेत.
विद्यार्थ्यांना मिळालेल्या यशाबद्दल रत्नभूमी जर्नालिजम इन्स्टिटयूटच्या प्रमुख श्रीमती धनश्री धनंजय पालांडे व सेंटरचे केंद्रसंयोजक अंकुश अशोक कदम यांनी सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.



