महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या उपसमित्यांमध्ये रत्नागिरीतील चौघे

पुणे : येथे महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या झालेल्या बैठकित सर्व उपसमित्यांवरील पदाधिकारी व सदस्यांची नावे संघटनेचे सरचिटणीस डॉ. प्रा. चंद्रजीत जाधव यांनी जाहीर केली. सर्व जिल्ह्यातील प्रतिनिधींना समाविष्ट करतानाच ज्येष्ठ आणि नव्या दमाच्या फळीला काम करण्याची संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये रत्नागिरी जिल्ह्यातील चारजणांचा समावेश आहे.
पुणे येथील महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या बैठकिला अध्यक्ष संजीवराजे निंबाळकर, कार्याध्यक्ष सचिन गोडबोले, खजिनदार अॅड. गोविंद शर्मा यांच्यासह सर्व संयुक्त चिटणीस आणि अन्य पदाधिकारी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. प्रा. चद्रजीत जाधव यांनी सर्व उपसमीत्या जाहीर केल्या. या सर्व उपसमित्या २०२४ ते २०२८ या कालावधीसाठी काम पाहणार आहेत. स्पर्धा समितीच्या कार्यकारी अध्यक्षपदी रत्नागिरीचे संदीप तावडे, प्रसिद्धी समितीच्या सचिवपदी राजेश कळंबटे, खेळाडू नोंदणी व तांत्रिक समिती सदस्यपदी कृष्णा करंजळकर तर निधी संकलन समितीवर यतीन जाधव यांची निवड करण्यात आली आहे. तसेच राज्याच्या स्विकृत उपाध्यक्षपदी लातूरचे आमदार अभिमन्यू पवार, पालघरच्या सौ. ग्रीष्मा पाटील, पुण्यातील सौ. अश्विनी पाटील यांची निवड करण्यात आली आहे.
समित्या पुढीलप्रमाणे : स्विकृत शासकीय परिषद सदस्य : जनार्दन शेळके (बीड), नामदेव गोमारे (लातूर), सौ. प्राची वाईकर (पुणे), सौ. माधुरी कोळी (ठाणे), श्रीमती सुजाता शानमे (धाराशिव), श्रीमती प्रविता माने (रायगड). कार्यालयीन सचिव : डॉ. प्रशांत इनामदार (सांगली). स्पर्धा समिती : संदीप तावडे (कार्यकारी अध्यक्ष, रत्नागिरी), कमलाकर कोळी (सचिव, ठाणे), रमेश नांदेडकर (सदस्य, नांदेड), जगदीश दवणे (सदस्य, पालघर). खेळाडू नोंदणी व तांत्रिक समिती : प्रा. डॉ. नागनाथ गजमल (कार्यकारी अध्यक्ष, हिंगोली), डॉ. नरेंद्र कुंदर (सचिव, मुंबई उपनगर), आशीष पाटील (सहसचिव, रायगड), नीलेश परब (सदस्य, मुंबई), सुरेंद्र विश्वकर्मा (सदस्य, मुंबई), महेंद्र गाढवे (सदस्य, सातारा), कृष्णा करंजळकर (सदस्य, रत्नागिरी), प्रियांका चव्हाण (सदस्य, ठाणे), श्वेता पाटेकर (सदस्या, मुंबई). पंच मंडळ : सुधाकर राऊळ (कार्यकारी अध्यक्ष, मुंबई), प्रशांत पाटणकर (सचिव, मुंबई उपनगर), नानासाहेब झांबरे (सहसचिव, पुणे), शरद व्हनकडे (सदस्य, सोलापूर), संदेश आंब्रे (सदस्य, मुंबई उपनगर), डॉ. रफिक शेख (सदस्य, जालना), किशोर पाटील (सदस्य, ठाणे), प्रभाकर काळे (सदस्य, धाराशिव), संतोष सावंत (सदस्य, परभणी), किरण वाघ (सदस्य, पुणे), डॉ. सौ. रत्नराणी कोळी (सदस्या, लातूर). निधी समिती : राजेंद्र महाले (कार्यकारी अध्यक्ष, धुळे), अनिल खोचरे (सचिव, धाराशिव), सचिन मुळे (सदस्य, छ. संभाजीनगर), डॉ. समीर शेख (सदस्य, सांगली), बाळासाहेब जामकर (सदस्य, परभणी), यतीन जाधव (सदस्य, रत्नागिरी), डॉ. राजेश सुभेदार (सदस्य, मुंबई उपनगर), सूर्यकांत ठाकूर (सदस्य, रायगड). पुरस्कार छाननी समिती : श्रीकांत ढेपे (कार्यकारी अध्यक्ष, सोलापूर), जगदीश नानजकर (सचिव, पुणे), निर्मल थोरात (सदस्य, अहमदनगर), शिरीन गोडबोले (सदस्य, पुणे), सौ. सुप्रिया गाढवे (सदस्या, धाराशिव).
प्रसिद्धी समिती : अजित संगवे (कार्यकारी अध्यक्ष, सोलापूर), राजेश कळंबटे (सचिव, रत्नागिरी), महेश विचारे (सदस्य, मुंबई), भूषण कदम (सदस्य, पुणे), संदीप बल्लाळ (सदस्य, पुणे), दादासाहेब चोरमले (सदस्य, सातारा), प्रेमचंद चौधरी (सदस्य, जळगाव), गणेश माळवे (सदस्य, परभणी). अनुशासन समिती : श्रीरंग इनामदार (कार्यकारी अध्यक्ष, पुणे), अॅड. बालाजी सगर किल्लारीकर (सचिव, छ. संभाजीनगर), अॅड. जयदीप वंशपायन (सदस्य, नाशिक), संजीव ठाकूर-देसाई (सदस्य, मुंबई), मनोज परदेशी (सदस्य, नंदुरबार). महिला कल्याण समिती : सौ. सारिका काळे-खोत (कार्यकारी अध्यक्षा, धाराशिव), सौ. राखी जोशी (सचिव, पुणे), सौ. नेहा तपस्वी-ताडे (सदस्या, पुणे), सौ. भाग्यश्री फडतरे (सदस्या, सातारा). ॲथलिट कमिशन : एजस शेख (कार्यकारी अध्यक्ष, मुंबई), सौ. रोहिणी आवारे (सचिव, धाराशिव), सौ. प्रियांका येळे (सदस्या, सातारा), श्वेता गवळी (सदस्या, अहमदनगर), पराग आंबेकर (सदस्य, मुंबई), आशुतोष गायकैवारी (पुणे, सदस्य), युवराज जाधव (सदस्य, सांगली).
,



