
रत्नागिरी : आंबा बागेतून आणलेल्या आळंबीची भाजी खल्ल्याने विषबाधा चाफे मधलीवाडी येथील दोन वर्षीय चिमुरडीसह सातजणांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याचे वैद्यकिय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
चाफे मधलीवाडी येथील मुकेश रमेश मांडवकर (वय ३४) हे त्यांचे सहकारी दिपक गोवळकर हे गुरुवारी सकाळी त्यांच्या आंबा बागेत गेले होते.आंबा झाडांच्या बुंध्याजवळ आलेली आळंबी काढून घरी आणली. त्यातील काही आंळबी त्यांनी पार्वती मांडवकर यांना दिली. घरात आंळबीची भाजी करुन खाल्यानंतर काही तासांनी सर्वांना उलट्यांचा त्रास होऊ लागला. घरातील २ वर्षांच्या चिमुरडीसह सातजणांना त्रास होऊ लागल्यामुळे त्यांना प्रथम जाकादेवी प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. तेथील वैद्यकिय अधिकाऱ्यांनी त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिल्यानंतर त्यांना गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.



